फोटोत दिसणारी उलट्या ‘U’ आकाराची बिल्डींग पुढील काही वर्षातील जगातली सर्वात लांबलचक इमारत म्हणून ओळखली जाणार आहे ज्याची लांबी तब्बल 4,000 (1.22 किमी) फुट असणारा आहे. म्हणजेच बुर्ज खलिफा पेक्षा दुप्पट उंच. या इमारतीला 'द बिग बेंड' नाव देण्यात आलं आहे.
द बिग बेंड न्यूयॉर्कच्या सेंट्रल पार्क जवळ ‘बिलियनियर रो’ या लग्झारी इमारतींच्या पंगतीत निर्माण केली जाणार आहे. आता बिल्डींग U आकारात आहे म्हणजे लिफ्ट कशी असणार ? तर ही सुद्धा एक गम्मत आहे या इमारतीत आडवी आणि उभी फिरू शकेल अशी लिफ्ट बसवणार असल्याचं म्हटलं जातय. ही लिफ्ट पूर्ण इमारतीत हॉरीजॉन्टली और वर्टिकली मूव होईल.
आता इमारत पुढील काही वर्षात तयार होईलच पण आपल्या वाचकांपैकी कोण कोण या इमारतीत घर घेण्याच्या विचारात आहे ?
