अजहर, एम. एस. धोनी, दंगल, सरबजीत अशा लागोपाठ आलेल्या बायोपिक्सनंतर बॉलीवूड मध्ये जणू बायोपिकचा नवा ट्रेंडच आलाय. दाउदची बहिण हसीना पारकर ते पद्मावती, गुलशन कुमार, संजय दत्त, अरुण गवळी अशा एकसे एक भन्नाट बायोपिक्सने येणारं पूर्ण वर्ष भरलं आहे. यावरून २०१७ ला आपण बायोपिक्सचं वर्षही म्हणू शकतो. पण मंडळी, यादी या वर्षापुरतीच संपत नाही बरं का! लिस्ट बडी लांबी हे जानी....
चला तर मग या वर्षात कोणते कोणते बायोपिक्स येत आहेत यावर एक नजर टाकूयात...














