गुगल मॅप्सवरवर आपण रस्ते, हॉटेल्स, बिल्डिंग, रेल्वेमार्ग अश्या अनेक गोष्टी पाहू शकतो आणि शोधू शकतो. पण गुगल मॅपच्या एका सॅटलाईट फोटोमुळे चक्क समुद्राखालील एका बेटाचा शोध लागलाय. हे बेट असे अचानक कसे तयार झाले? यावर तज्ञांचा अभ्यास चालू आहे. या बेटाचा फोटो सगळीकडे व्हायरल होतोय. पाण्याखाली गेलेले हे बेट कधी तयार झाले असावे यावर खूप चर्चा होतेय.
केरळमधील कोचीच्या पश्चिम समुद्र किनाऱ्याच्याजवळ हे बेट दिसत आहे. या बेटाचा आकार एखाद्या काजूसारखा आहे. बेट म्हटले की आपल्या डोळ्यासमोर जे दिसतं तसा या बेटाबाबत नाही. हे बेट पूर्णपणे पाण्यात बुडालेले आहे. आकाराबद्दल बोलायचे बेटाचा आकार पश्चिम कोचीच्या क्षेत्रफळाच्या अर्ध्या भागाइतका मोठे आहे. चेल्लनम कारशिका टूरिझम डेव्हलपमेंट सोसायटीने केरळ यूनिवर्सिटी ऑफ फिशरीज अँड ओशनस्टडीजच्या (KUFOS) अधिकाऱ्यांना पत्र लिहून याची माहिती दिली. आणि पुढे चौकशी करण्यास सांगितले आहे. अॅकेएक्स जुलप्पन यांच्या म्हणण्यानुसार या बेटाची लांबी ८ किमी आणि रुंदी ३.५ किमी आहे.

