भारतीय लोक देशात तर आपल्या कामाची छाप सोडतात आणि ते परदेशातही विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करतात. शैक्षणिक क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात, राजकारणात अनेक मोठ्या पदांवर भारतीय लोक उत्तम कामगिरी करत भारताची मान उंचावतात. यात भारतीय मुलीही अजिबात मागे नाहीत. अमेरिकेत अंतराळात जाण्यापासून ते सौंदर्यस्पर्धा जिंकत या तरुण मुली सर्व जगाचे लक्ष वेधून घेत आहेत. नुकतेच ६० स्पर्धकांना मागे टाकत मिशिगनच्या वैदेही डोंगरेने मिस इंडिया यूएसए विजेतेपद जिंकले आहे. वैदेहीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
मिशिगनच्या २५ वर्षीय वैदेही डोंगरे हीने ‘मिस इंडिया यूएसए (Miss India USA २१) चे विजेतेपद पटकावले आहे.


