मुंबईच्या मुसळधार पावसात बाप लेकीसाठी धावून आले मुंबई पोलीस अधिकारी!!

मुंबईच्या मुसळधार पावसात बाप लेकीसाठी धावून आले मुंबई पोलीस अधिकारी!!

सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने अनेक ठिकाणी पावसामुळे लोकांचे हाल होत आहेत. मुंबईतील परिस्थिती तर जास्तच वाईट आहे. अशावेळी मुंबई पोलिसांचे कार्य नेहमीच कौतुकास्पद असते. अनेक ठिकाणी पाऊस साचल्यावर, इमारती ढासळल्यावर किंवा इतर संकटात पोलीस धावून जात असतात. मुंबई पोलिसांच्या मोठ्या मनाचा प्रत्यय देणारा एक व्हिडिओ सध्या वायरल होत आहे.

मुंबई पोलिसांच्या ट्विटर हँडलवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यात एक पोलीस कर्मचारी एका बापलेकीला पावसातून वाचवत आहे. हा व्हिडीओ कांदिवलीतला आहे. या व्हिडीओत पोलीस बापलेकीला पावसातून वाचवून त्यांच्या डोक्यावर छत्री धरताना दिसत आहेत.

सध्या सुरू असलेला पाऊस हा जीवघेणा आहे. अशाही परिस्थितीत जोखिम घेऊन दुसऱ्यांना वाचवनाऱ्या हा पोलीसांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. हा व्हिडीओ वायरल झाल्यावर लोकांनी या पोलीस कर्मचाऱ्याच्या धाडसाला आणि त्यांच्या सेवाभावी स्वभावास दाद दिली आहे.

हा व्हिडीओला मुंबई पोलिसांच्या ट्विटर हँडलवर ५७,००० व्ह्यूज तर ४२०० लाईक्स आलेले आहेत. गेल्या काही काळात अशा गोष्टी वाढत असल्याने इतर लोकांना देखील मदतीसाठी प्रोत्साहन मिळत आहे.