आजचा अभंग : तिर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल गायीका -अरुणा साईराम
भारत रत्न पंडीत भीमसेन जोशी यांच्या आवाजात नामदेवाचा अभंग तीर्थ विठ्ठल घरा घरात पोहचला आहे. या अभंगाचे दाक्षिणात्य रुप आपण आज ऐकणार आहोत पद्मश्री अरुणा साईराम यांच्या आवाजात. अरूणा साईराम ह्यांनी कर्नाटकी संगीताच्या अंगाने हा अभंग गायला आहे. अरुणा साईराम ह्या संगीत नाटक अकादमीच्या व्हाइस चेअरमन आहेत. त्यांना भारत सरकारने पद्मश्री या पद्म पुरस्काराने सन्मानीत केले आहे. पाहू या आणि ऐकू या हिंदुस्थानी आणि दाक्षिणात्य शैलीचा संगमाची झलक
वारीचे अभंग 4 - अरुणा साईराम यांच्या आवाजातील 'तीर्थ विठ्ठल'
