भाऊ, सोशल मिडियावर रोज काहीतरी व्हायरल व्हायलाच हवं. "डेटा झाला स्वस्त, बघा व्हिडिओ मस्त" म्हणत तुम्ही आम्ही रोज अनेक व्हिडीओ पाहतोच. पण आज एक लै भारी व्हिडीओ लागलाय हाती. एका कार आणि विमानामधल्या रेसचा, तेपण साध्यासुध्या नाही, तर मिग 29k आणि लॅम्बॉरघिनी हरिकेन या कारमध्ये. तर मग कोण जिंकलं ते व्हिडीओ मध्ये पाहाच.
कुणी बनवला हा व्हिडीओ?
हा व्हिडीओ गोव्याच्या विमानतळावर शूट झालाय, आणि हा व्हिडीओ तयार केलाय भारतीय नौसेनेने. भारतीय नौसेनेमध्ये भरतीसाठी तरुणांची गरज आहे. यातल्या काही जागा ह्या वैमानिकाच्यासुद्धा आहेत. हा व्हिडीओ हा एक प्रकारे विमान उडवण्यातला थरार दाखवून तरुणांना आकर्षित करायचा प्रकार आहे.
मग झालात का आकर्षित??? होणार का नेव्हीत भरती???
व्हिडीओ ऑफ द डे: लॅम्बॉरघिनी आणि मिग 29के मध्ये लागली रेस
