ऐका काव्यवाचन (हिन्दी) 'मुसलमान'.

ऐका काव्यवाचन (हिन्दी) 'मुसलमान'.

हिन्दी भाषेचा एक प्लस पॉईन्ट म्हणजे डेमोग्राफिकली तिचा वापर फार मोठ्या क्षेत्रात होतो. याचा आणखी एक फायदा म्हणून या भाषेत व्यक्त होणार्‍या अनुभवांची व्याप्तीही मोठी होते. हिन्दी भाषेचा वापर होताना तो अनेकदा लखनौ-वाराणसीच्या उत्तर प्रदेशी, भोपाळ-ग्वाल्हेरच्या मध्य प्रदेशी किंवा अगदी मुंबई-ठाण्याच्या महाराष्ट्री अनुभवांसकट होतो. या अनुभवांमधून जन्म घेणारी कविता ऐकत असताना त्या क्षणाला आत कुठे तरी पिळवटून टाकते.

असाच एक अनुभव दिला मुंबईतील हिन्दीचे प्राध्यापक डॉ. हूबनाथ पांडेंच्या 'मुसलमान' नावाच्या कवितेच्या प्रसिद्ध कलाकार श्री. राजेन्द्र गुप्ता यांनी केलेल्या वाचनाने. कवितेतल्या भावनांचा कल्लोळ राजेन्द्र गुप्तांच्या आवाजातून आपल्या हृदयात उतरून कंठ दाटवतो. शेवटी शेवटी गुप्तांनाही भावनांवर काबू ठेवणं कठीण होतं आणि आपल्यालाही.

हा 'मुसलमान' काव्यवाचनाचा विडीओ -