सोशल मिडीयावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये फुल आहे की किडा?

सोशल मिडीयावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये फुल आहे की किडा?

निसर्गातील अश्या अनेक गोष्टी आहेत ज्यांना पाहून थक्क व्हायला होते. म्हणजे फुलं, फळं, झाडं, प्राणी, पक्षी, किडे यातील विविधता पहिलीत तर आश्चर्य वाटते. सजीवांमध्ये पण इतक्या निरनिराळ्या जाती, प्रजाती आहेत. छोट्याश्या किटकांसापासून अगदी मोठमोठे प्राणी पाहिलेत तर  लक्षात येईल एकासारखा दुसरा नाही. त्याच्यात साधर्म्य आढळते पण काहीनाकाही वेगळे वैशिष्ट्य दिसतेच. असाच एक विलक्षण किड्याच्या व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. तुम्ही व्हिडीओ पाहिलात तर प्रश्न पडेल, की हे फुल आहे की किडा? इतका सुंदर किडा तुम्ही नक्कीच पहिला नसेल.

आर्किड मॅन्टिसेस (Orchid Mantises)असे या किटकाचे नाव आहे. त्याचा रंग आणि आकार एखाद्या सुंदर फुलासारखा आहे. एड्रियन कोझाकीविझने याचा व्हिडीओ शेयर केला आहे. व्हिडिओमध्ये एका व्यक्तीच्या तळहातावर चालणारे किडे दिसतात. ही फुले किंवा कीटक आहेत हे कळणे अवघड जाते. या विलक्षण आर्किड मॅन्टिसेस किटकाची व्हिडीओ क्लिप बघता बघता बघता व्हायरल झाली आहे. 

फेब्रुवारीमध्ये एड्रियनने हा व्हिडिओ शेअर केला होता पण तो पुन्हा एकदा व्हायरल झाला आहे. आर्किड मॅन्टिसेस दक्षिणपूर्व आशियातील उष्णकटिबंधीय जंगलात आढळतात. याचा रंग गुलाबी आणि पांढरा असतो. ते आर्किड फुलासारखे दिसते. पाकळ्या, एक छोटी हिरवी किनार आणि पाठीवर काही रेषा असे या किटकाचे स्वरूप असते. त्याचा चेहरा त्रिकोणी आणि डोळे उभे अंडाकृती असतात. याच्या सुंदर दिसण्यावर जाऊ नका, हे जबरदस्त शिकारी असतात. आपल्या दिसण्याने ते किड्यांना आकर्षित करतात आणि त्यांची शिकार करतात. मधमाशी हे त्यांचे लाडके अन्न आहे. या किटकाची मादी ६ से.मी. लांब असते ते नराची लांबी अवघी ३ सेंमी असतो. हे मलेशिया, इंडोनेशिया आणि इतर उष्णकटिबंधीय प्रदेशात आढळतात.

लाखो व्ह्यूज मिळालेला ही क्लिप नेटकर्यांना खूप आवडली. निसर्गाची अद्भुत किमया प्रत्येकवेळी माणसाला आश्चर्यचकित  करून जाते नाही का?

लेखिका: शीतल दरंदळे