याने दिलं थेट नरेंद्र मोदींना फिटनेस चॅलेंज !! वाचा नक्की काय प्रकरण आहे हे !!

याने दिलं थेट नरेंद्र मोदींना फिटनेस चॅलेंज !! वाचा नक्की काय प्रकरण आहे हे !!

मंडळी, राज्य क्रीडा मंत्री राजवर्धन राठोड हे फिटनेसच्या बाबतीत गंभीर दिसत आहेत. त्यांनी नुकतंच एक चॅलेंज सुरु केलं असून या चॅलेंज मध्ये त्यांनी ह्रितिक रोशन, विराट कोहली आणि सायना नेहवाल यांना त्यांचा फिटनेस व्हिडीओ शेअर करायला सांगितलं होतं.

या चॅलेंजला स्वीकारून विराट कोहली, सायना नेहवाल आणि ह्रितिक रोशन यांनी त्यांचा फिटनेस व्हिडीओ शेअर केला आहे. हे इथेच न थांबता या तिघांनी आपापल्या मित्रांना हे चॅलेंज दिलंय. ह्रितिक रोशनने टायगर श्रॉफला हे चॅलेंज पास केलं तर सायना नेहवालने राणा दग्गुबाती, गौतम गंभीर आणि पी व्ही सिंधू यांना चॅलेंज दिलं.

 

राव, या तिघांमध्ये विराट कोहली वरचढ ठरलाय. त्याने तर थेट नरेंद्र मोदींना चॅलेंज केलंय आणि आश्चर्य म्हणजे नरेंद्र मोदींनी या चॅलेंजला स्वीकारलं आहे. ‘आपण लवकरच आपला फिटनेस व्हिडीओ शेअर करू’ असं ते म्हणाले. विराटने धोनी आणि अनुष्का शर्माला सुद्धा हे चॅलेंज दिलंय. पतीचं चॅलेंज स्वीकारून तिने आपला व्हिडीओ सुद्धा शेअर केला.

अनुष्काने पूर्ण केलेलं चॅलेंज !!

पी व्ही सिंधूने पूर्ण केलेलं चॅलेंज

टायगर श्रॉफचा फिटनेस व्हिडीओ

‘जिमचे पैसे भरून जिमला न जाणाऱ्या’ संघटनेच्या समस्त सभासदांना या सर्वांच्या व्हिडीओने हुरूप येईल राव. आज नको उद्या जातो म्हणत वर्षानुवर्ष पोट वाढवणारी माणसं आता तरी सुधारती. असो....

मंडळी, तुम्हाला सुद्धा व्यायाम आणि फिटनेस आवडत असेल तुमचा व्हिडीओ आमच्या सोबत नक्की शेअर करा. तुम्ही तुमचा व्हिडीओ या लेखाच्या कमेंट बॉक्स मध्ये किंवा ट्विटरवर https://twitter.com/bobhatamarathi या बोभाटाच्या ऑफिशयल अकाऊंटवर पाठवू शकता.

मग वाट कसली बघताय करा सुरुवात !!

टॅग्स:

narendra modi

संबंधित लेख