विठ्ठलभक्तीची आजवर अनेक रूपं पाहिलीत. दूरदर्शनवर येणाऱ्या संतवाणीपासून अगदी पंडित भीमसेन जोशींच्या आवाजात आपण विठ्ठल भजनं ऐकण्यात तल्लीन झालो होतो.
पण आज एक वेगळा प्रयोग पाहण्यात आला. "अभंग रिपोस्ट" नावाच्या एका बँडने बेस गिटार, अकोस्टिक गिटार आणि तबल्याच्या साथीने पुंडलिक वरदे हरि विठ्ठल या अभंगाचे एक नवे रूप आपल्याला सादर केले आहे. आजवर आपल्या कानाला अशा प्रयोगाची सवय नसल्यामुळं कदाचित थोडे विचित्र वाटले तरीही ह्यात या बँडची भक्ती दिसून येते. तर घ्या आस्वाद ह्या गाण्याचा आणि प्रोत्साहन द्या अशा प्रयोगांना.
