आलाय बघा ढिन्च्याक पूजाचा भाव..

आलाय बघा ढिन्च्याक पूजाचा भाव..

मंडळी काही माणसांना डॉक्टर व्हायचं असतं, काही माणसांना इंजिनियर व्हायचं असतं तर काही लोक पोलीस बनतात. पण काही लोक जाम थोर असतात. राव, ते डायरेक्ट ‘मीम’ बनतात. हे थोर लोक सोशल मिडीयावर लय गाजतात. अशातला एक भारी फोटू काही दिवसांपूर्वी फेबु, ट्विटर, व्हाट्सअप वर आला अन् मीम होऊन गेला.

राव,  हा फोटोतला मुलगा कोण हाय? कुणालाच म्हायत नाय. पण यानं दिलेली पोज भल्या भल्यांना तोंडात बोटं घालायला लावत हाय. याच्यासमोर तर आपला शारुख पण चाय कम पानी वाटावा. राव, आम्हाला काय वाटतंय हा पोरगा की नाय ढिंच्याक पूजाच्या परंपरेतून आलेला हाय!!

थोडक्यात, सोशल मिडीयाच्या जमान्यात कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाय. हे पोर याचंच उदाहरण...