कौन बनेगा करोडपतीने भल्याभल्यांना वेड लावले. त्यावर क्विझ गेम्सही निघाले. अजूनही पुढचा सीझन जाहीर झाला की आपलं नशीब साथ देईल म्हणून लोक ’कौन बनेगा..’ला फोन करत राहतात. अगदीच काही नाही तर किमान अमिताभ बच्चनना जवळून पाहता येईल हा देखील हेतू असतोच. जाता-जाता काही पैसे मिळाले तर सोन्याहून पिवळंच, नाही का? तसंही या खेळात आपल्या जवळचं काही गमावण्यासारखं नसतं. मग हा गेम इतका पॉप्युलर झाला नसता तर आश्चर्यच वाटले असते!!
’कौन बनेगा.."चे आजवर ८ सीझन्स झाले आहेत. पाहूयात आजवर हा खेळ कोण जिंकलं आणि आजच्या घडीला ते विजेते काय करत आहेत ते..






