मोबाईल बंद करून पुन्हा चालू केला, नेट कनेक्शन तपासलं, वायफाय चेक केला, मोबाईल खराब तर झाला नाही ना म्हणून नीट चेक केलं पण राव काहीच उपयोग झाला नाही. व्हॉट्सऍप चालतच नाहीये....हे काय झालं ? जगबुडी ? इल्युमिनाटी ? नॉर्थ कोरियाने हमला केला ? इलियन आल्यावर सगळे फ्युज उडतात तसे सगळ्यांचे व्हॉट्सऍप बंद झाले ? नाही नाही त्या विचारांनी पछाडलं राव !!
असेच विचार तुमच्या मनात आले ? आमचं पण सेम झालं....
+काय झालंय ना अनेकांचे व्हॉट्सऍप आज अचानक डाऊन झाले म्हणून गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. आणि हे फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगात झालंय भाऊ. काही वेळा पुरतंच बंद होऊन व्हॉट्सअपने मोठा धक्का दिला.
....पण भाऊ एवढ्या लवकर काय बी होणार नाय. पुढच्याच मिंटाला व्हॉट्सऍप एकदम नॉर्मल, मख्खन की माफीत चलने लगा मालूम ?
पण आज एक गोष्ट समजली राव, व्हॉट्सऍप एका सेकंदासाठी जरी बंद पडला तर हाहाकार माजेल, अफरातफरी माजेल (सोशल मिडियावर), विनाश ओढवेल.....नको !! नको !! नको !!....तो विचार पण नको बाबा !!!
अपडेट: अजून तरी व्हॉट्सऍप का बंद पडलं होतं त्याचा खुलासा झाला नाहीए. त्यांचे इन्वेस्टिंगेशन पूर्ण झालं की आम्ही अपडेट करूच.
