मंडळी भारतीय लोकांच आणि प्राण्याचं एक अनोखं नातं आहे. आता बघा हा, गाईंची आपण पूजा करतो, उंदीर हे गणपती बाप्पाचं वाहन आहे म्हणून आपण त्याला मानतो, हत्ती म्हणजे गणपती स्वतः बाप्पाच, माकड म्हणजे साक्षात हनुमान, कुत्रा म्हणजे भैरव, कावळा तर खुद्द ज्ञानेश्वरांच्या अभंगात सुद्धा आढळून येतो. पण कांगारूचं काय ? हे बिहार मधले लोक कांगारूची पूजा का करतायत ?
राव अंधश्रद्धा काय असते तर ते हेच. वरील व्हिडीओत बिहार मधील काही स्त्रिया कांगारूची पूजा करताना दिसतायत पण हा कांगारू म्हणजे चक्क कचऱ्याचा डब्बा आहे राव. त्याच्या पोटात असलेल्या जागेत कचरा टाकायचा सोडून या बायका त्याला पाण्याने ‘अभिषेक’ करत आहेत, हळद-कुंकू, फुले वाहत आहेत, पाया पडत आहते. अरे काय चाल्लय काय ? वरील प्रकार बघून या स्त्रियांच्या अज्ञानाची कीव येते राव.
बिहार मध्ये ‘छट पूजे’च्या वेळी हा प्रकार घडला. हा व्हिडीओ ‘अनिल थॉमस’ नावाच्या फेसबुक युझरने अपलोड केल्यानंतर सोशल मिडीयावर या व्हिडीओने धुमाकूळ घालायला सुरुवात केली. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. कदाचित तुम्हालाही व्हॉट्सअपवर आला असेल.
मंडळी आम्हाला काय वाटतंय हा कांगारू लय लकी हाय, कारण असाच कचऱ्याचा डब्बा पेंग्विन, माकडाच्या आकारातसुद्धा असतो पण इथे मान मिळाला थेट ऑस्ट्रेलियाच्या कांगारूला !!
तर मंडळी, यावर तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये लिहून आम्हाला नक्की कळवा. होऊदे चर्चा !!
