या गावाला कोळ्यांच्या जाळ्यांनी गिळून टाकलंय.....पाहा बरं असं का घडलं !!

या गावाला कोळ्यांच्या जाळ्यांनी गिळून टाकलंय.....पाहा बरं असं का घडलं !!

कोळ्यांच्या भल्यामोठ्या जाळीने गाव बंदिस्त झालं आहे आणि त्यात लोक कसेबसे राहत आहेत. हजारो कोळी गावावर राज्य करत आहेत. ही कथा काहीशी हॉलिवूडच्या भयपटाची वाटते. हो ना ? पण हे खरोखर घडलंय ग्रीसच्या किनारी भागातल्या आयटॉलिको गावात. या गावाच्या आजूबाजूला असलेली झाडी, रस्त्यांवर, समुद्र किनार्यांवर कोळ्यांनी जाळी विणली आहे. लांबून पाहिल्यास गावाला कोळ्यांच्या जाळ्यांनी गिळून टाकलंय असं वाटेल. पण कोळ्यांनी नेमकं याच गावाला का निवडलं ?

मंडळी, झालं असं की, आयटॉलिको गावात डासांची संख्या वाढली. मग डासांना खाणाऱ्या कोळ्यांची संख्याही वाढली. भरपूर अन्न व पोषक वातावरणामुळे इथे तब्बल ३०० मीटरच्या जागेत जाळीचं साम्राज्य उभं राहिलं आहे. २००३ पासून याची सुरुवात झाली. आतापर्यंत गावकऱ्यांना या जाळ्यांची सवय झालीये.  

चला तर या गावाचे काही चक्रावून टाकणारे फोटो पाहून घ्या !!

स्रोत

स्रोत

स्रोत