झोप लागत नाही हा अनेकांचा तक्रारीचा विषय. प्रेमात पडलेल्या लोकांची गोष्ट वेगळी ओ पण सामान्य पब्लिकचं काय ? ही झाली आपल्या झोपण्याची समस्या. पण समजा तुम्ही एका तंबूत झोपलेले आहात आणि बाहेर मशीन गन्स असंख्य गोळ्या झाडत आहेत, रणगाड्यांमधून गोळे फेकले जातायत, माणसांच्या आरोळ्या/किंकाळ्यांचा आवाज येतोय. अशा वातावरणात सैनिकांना झोप कशी लागत असेल ?
कारणं काहीही असली तरी समस्य झोपेचीच. पण सैन्याने यावर फार पूर्वीच उपाय शोधलाय. हा उपाय आपण सामान्य नागरिक सुद्धा करू शकतो शकतो.
चला तर झोपेची समस्या सोडवूया.
या सोप्प्या ट्रिकचा उल्लेख “लॉयड बड विंटर” या लेखकाच्या "Relax and Win" या पुस्तकात आढळतो. विंटर हे धावपटूंना प्रशिक्षण द्यायचे. त्यांना ही सोप्पी कल्पना तयार करण्याची गरज पडली ती दुसऱ्या महायुद्धामुळे. झालं असं की, दुसऱ्या महायुद्धात मोठ्या प्रमाणावर वैमानिकांचा जीव जात होता. याचं कारण शत्रू नसून चक्क झोप होती. पुरेशी झोप न झाल्याने फायटर प्लेनचे वैमानिक चुकीचा निर्णय घेऊ लागले होते. त्यामुळे त्यांचा हकनाक जीव जायचा. ही समस्या सोडवण्यासाठी विंटरना आमंत्रित करण्यात आलं. त्यांनी या समस्येवर २ उपाय काढले. १. शारीरिक विश्रांती आणि २. मानसिक विश्रांती.
या दोन सोप्प्या पद्धतींचा ६ आठवडे सराव केल्यानंतर सैनिकांमध्ये फरक जाणवू लागला. सैनिक चक्क ऐन रणभूमीत २ मिनिटात झोपी जाण्यात यशस्वी झाले. चला आता या ट्रिक्स शिकून घेऊया.






