फाशीची शिक्षा आजही विवादाचा विषय आहे. भारतात फाशीची शिक्षा ही सर्वात मोठी शिक्षा मानली जाते. एका न्यायाधीशासाठी एखाद्या कैद्याला शिक्षा देणं हे त्याच्या कामाचा भाग असला आणि न्यायमूर्ती म्हणून कर्तव्य असलं तरी माणूस म्हणून हे नक्कीच अवघड आहे.

हिंदी सिनेमांमध्ये जजने फाशीची शिक्षा दिल्यानंतर त्याच्या पेनची निब तोडण्याचा एक खास सीन हमखास दाखवला जातो. हे फक्त सिनेमातच नव्हे तर खऱ्या खुऱ्या कोर्टात देखील होतं. या मागचं कारण म्हणजे न्यायाधीश ज्या पेनाने कैद्याला फाशीची शिक्षा सुनावतो त्या पेनाने एका व्यक्तीचं जीवन संपवलेलं असतं आणि याचं प्रतिक म्हणून पेनाची निब तोडली जाते. ज्या पेनाने एक जीव घेतला तो पेन पुन्हा कधीही वापरण्यात येऊ नये असा उद्देश्य या मागे असतो.
जसं न्यायाधीश फाशीची शिक्षा सुनावतो तसच जल्लादच्या हातून प्रत्यक्ष फाशी दिली जाते. यावेळी जल्लाद तो करत असलेल्या कामाबद्दल कैद्याच्या कानात ‘मला माफ कर’ असं म्हणतो. या दोन्ही व्यक्ती तटस्थपणे त्याचं त्याचं काम करत असतात पण एक माणूस म्हणून दुसऱ्या माणसाचा जीव घेताना त्यांना हे करावच लागतं.
