ओला-उबर आणि टॅक्सीवाल्या लोकांना पेट्रोल-डिझेलऐवजी CNG च परवडतो. पण CNG पंपांचीसंख्या इतकी कमी असते की बिचाऱ्यांचा अर्धा वेळ चांगल्या गॅस प्रेशरचा CNG पंप शोधण्यात आणि राहिलेला तिथं आपला नंबर कधी येतो याची वाट पाहण्यात जातो. बरं, या CNG पंपांवर प्रत्येक ठिकाणी सारखे नियम नसतात. काही ठिकाणी गॅस भरताना खाली उतरा म्हणतात तर काही ठिकाणी काही गरज नाही म्हणता.
मग, खरं काय? उतरावं की उतरु नये? याच प्रश्नाचं उत्तर आजच्या या लेखात तुम्हांला मिळेल.
पेट्रोलच्या वाढत्या किंमत पाहून, ऐकून आपल्याला घाम फुटतो. रोजच्या रोज वाढत जाणारा आकडा पहिला की आपल्या महिन्याचे खर्चाचे गणित कोलमडते. पेट्रोलसाठी स्वस्त पर्याय म्हणून अनेकजण CNG वापरतात.CNG मुळे बराच प्रवास खर्च वाचतो. त्यामुळे रोजच्या रोज प्रवास करणारे CNG कार घेताना दिसतात.
CNG पर्याय स्वस्त आहे आणि पेट्रोल किंवा डिझेल कारपेक्षा कमी उत्सर्जन करते. CNG म्हणजे Compress Natural Gas. हा गॅस अस्थिर आहे म्हणजे भरताना पुढे काय होईल हे सांगता येत नाही. हा भरताना दाबामुळे तापू शकतो किंवा गळतीमुळे आग लागू शकते. कधी कधी तर फुटून स्फोट ही होऊ शकतो. या कारणामुळे तुमचे वाहन पेटू शकते आणि अपघात घडू शकतो.

