५०० रुपयांची नोट खोटी असल्याचा व्हिडिओ खरा की खोटा? कारणांसह उत्तर जाणून घ्या!!

५०० रुपयांची नोट खोटी असल्याचा व्हिडिओ खरा की खोटा? कारणांसह उत्तर जाणून घ्या!!

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ वायरल होत आहे. या व्हिडिओत एक विशिष्ट प्रकारची ५०० रुपयांची नोट स्वीकारली जाणार नाही असे म्हटले आहे. हा व्हिडिओ बघून अनेकांना टेन्शन आले आहे. कारण विषय पैशांचा आहे. तर काय आहे या व्हिडिओमागील सत्य हे जाणून घेऊया.

या व्हिडीओत असे दाखवले गेले आहे की, ज्या ५०० रुपयांच्या नोटेवर महात्मा गांधींच्या फोटोजवळ सिक्युरिटी थ्रेडवर इंडिया आणि भारत लिहिले असेल तर तो नोट बनावट आहे. यात असेही म्हटले गेले की तीच नोट स्वीकारावी ज्यात आरबीआय प्रिंटेड रिबिन हे गांधीजींच्या फोटोपासून दूर, तर आरबीआय गव्हर्नरच्या सहीच्या जवळ असेल.

पण हा व्हिडिओ खोटा आहे आणि या व्हिडिओवर कोणीही विश्वास ठेवू नये. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या ऑफिशियल इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ फेक असल्याचे म्हणण्यात आले आहे. सरकारकडून देखील स्पष्ट करण्यात आले आहे की दोन्ही प्रकारच्या नोटा स्वीकार केल्या जातील. सोबतीला पीआयबीने खऱ्या आणि खोट्या नोटा कसे ओळखावे यावरही व्हिडिओ पोस्ट केला आहे.

५०० रूपयांच्या नोटेची स्टँडर्ड साईज ही ६६mm×१५०mm ही आहे, तर बेस कलर हा स्टोन ग्रे असतो. सरकारने असेही सांगितले आहे की जर नोटेत फेरफार असेल तर नोटेत असलेल्या सिक्युरिटी फिचरमुळे हिरवी नोट निळी होते. या कारणाने बनावट नोट ओळखणे शक्य होते. तसेच खराब झालेली नोट असो की बनावट नोट, ती ओळखण्यासाठी स्पेशल जिओमेट्रिक डिजाईन आणि पॅटर्न आहेत.

म्हणून त्या व्हिडिओवर कुणीही विश्वास ठेऊ नये, तसेच इतरही लोकांना हा लेख फॉरवर्ड करून इतरांची पण शंका दूर करावी.

उदय पाटील