पैसे कमावण्याचे अनेक मार्ग असतात. कोण कुठला मार्ग वापरून पैसे कमवेल याचा नेम नाही. पण काहींचा पैसे कमावण्याचा मार्ग मात्र कुणी विचारही करणार नाही असा असतो. अमेरिकेत एक बाई चक्क पादण्यातून पैसे कमवते. एवढेच नाही, तर यातून ती करोडपती झाली आहे. पण हा व्यवसाय तिच्या चांगलाच अंगलट आला आहे.
स्टेफ मोटो असे त्या ३१ वर्षीय महिलेचे नाव आहे. ९० डे फियांस या रिऍलिटी शोमध्ये ती काम करत असे. यातून तिला प्रसिद्धी मिळाली. नंतर तिने स्वतःचा युट्यूब चॅनेल सुरू केले. पण यातून मिळालेली ओळख आणि पैसे यश बाईला कदाचित कमी वाटत असतील. म्हणून तिने हा नवा व्यवसाय सुरू केला.
शरीरातील गॅस एका जारमध्ये साठवून तिने विकण्यास सुरुवात केली. एक जारमागे ती हजार डॉलर घेत असे. भरीसभर म्हणून सणासुदीला ५०% डिस्काउंटही ती देत असे. आता मागणी असेल तर पुरवठा असावाच लागतो. या पादउद्योजकीने मग जास्तीतजास्त गॅस तयार व्हावा यासाठी त्या पद्धतीने डायट घेण्यास सुरुवात केली. अंडी वगैरे जास्तीतजास्त प्रमाणात आहारात समाविष्ट केले.
नंतर तिने आपल्या आहारात प्रोटीन शेकचा समावेश केला. कारण काय तर यामुळे गॅसचा वास अधिकाधिक घाण यावा. दिवसाला तीन प्रोटीन शेक ती पीत असे. सोबतीला ब्लॅक बिन सूप असे. तिला पैसे आणि ओळख तर मिळत होती. पण यामुळे तिच्या तब्येतीची काय होईल याचा अंदाज तिला आला नाही.
एके दिवशी संध्याकाळी झोपलेली असताना अचानक तिला श्वासाचा त्रास व्हायला लागला. तसेच छातीत काहीतरी टोचत आहे असे वाटायला लागले. एका मित्राला बोलवून तिने स्वतःला दवाखाण्यात न्यायला लावले. डॉक्टरांनी मग सर्व टेस्ट केल्यावर हे सर्व प्रकरण जास्त गॅस सोडण्यामुळे तयार झाल्याचे सांगितले.
शेवटी आता तिने हे सर्व झाल्यावर तिचा हा व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
उदय पाटील
