खरा खेळ रंगतो तो मातीत. मॅटवर खेळल्या जाणार्या खेळांची त्याच्याशी तुलनाच नाही.
कबड्डी हा तसा महाराष्ट्राचा परंपरागत खेळ. पण तो सहसा पुरूषच खेळताना दिसतात. स्त्रियांचा सहभाग कमीच. या व्हिडिओत मात्र नऊवारी साडीतल्या आज्यांपासून पाचवारी साडी ते जीन्स घातलेल्या सगळ्याजणींचा कबड्डीचा खेळ मस्त रंगलाय. अनुपकुमारच्या वरताण पाय लांबवून प्रतिपक्षाला आऊट करणार्या काकू भारी की दातांचं बोळकं झालेली आजी भारी हे मात्र सांगता येणं कठीण आहे.
