पाहा ७०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त वाघा बॉर्डरवर देशभक्तीपूर्ण सोहळा

पाहा ७०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त वाघा बॉर्डरवर देशभक्तीपूर्ण सोहळा

वाघा बॉर्डरवर रोज संध्याकाळी गेट बंद करतानाचा सोहळा भारत आणि पाकिस्तान, दोन्ही देशांचे नागरिक तितकाच उत्सुकतेने पाहतात. तिथे १५ऑगस्ट आणि २६जानेवारी हे दिवस सोडून इतर दिवशीही लोकांना देशप्रेमाचं भरतं आलेलं असतं आणि त्यांचे जोरजोरात जयजयकार करण्याचे व्हिडिओज तुम्ही पाहिले असतीलच. 

 

तर काल होता भारताचा ७०वा स्वातंत्र्यदिन. तसाही भारत-पाकमधून विस्तवही जात नाही. १५ ऑगस्टला तर दोन्ही बाजूंच्या सैनिकांच्या उत्साहाला उधाण आलं होतं. त्या निमित्तानं गेट बंद करताना होणार्‍या खास बिटिंग रिट्रीट सोहळ्याचा व्हिडिओ दूरदर्शन न्यूज लाइव्हने प्रसारित केलाय. जरा पाहा बरं ही फिल्म आणि आनंद लुटा प्रत्यक्ष वाघा बॉर्डरवर असल्याचा.