सना अनिलकुमार हा तेलंगणामधल्या एका छोट्या गावातला मुलगा. एकदा घरातले लाईट गेल्यानंतर त्याने सावल्यांचा एक प्रयोग केला आणि त्याला ही कला गवसली.
सना घरातल्या बाटल्यांची बुचं, टूथब्रश, कागद, पुस्तकं, शांपूच्या बाटल्या, कप, असं जे हाताला लागेल ते सगळं एकत्र करून त्यातून कलाकृती निर्माण करतो. त्याने आजवर हिंदू देवदेवता, सेलिब्रिटी, इमारती आणि बर्याच वस्तूंच्या शॅडो आर्ट बनवल्या आहेत. एखादी छोट्या वस्तूची सावली बनवायला चार-पाच तास लागतात. पण तेच एखाद्या देवतेची किंवा माणसाची शॅडो आर्ट बनवायची असेल तर आठ तास सहज लागतात.
त्याने आजपर्यंय सुमारे चाळीस कलाकृती बनवल्या आहेत. त्याने बनवलेल्या दुर्गामाता आणि गणपतीच्या मूर्ती खूप प्रसिद्ध आहेत. आज बोभाटा.कॉमच्या वाचकांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत सना अनिलकुमारच्या काही कलाकृती..









