कालचा दिवस भारतीय न्यायव्यवस्थेसाठी ऐतिहासिक ठरला आहे. एकाच वेळी थेट ९ न्यायाधीशांनी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची शपथ घेतली आहे. त्यातही विशेष गोष्ट अशी की यात तीन महिला न्यायाधीशांचा समावेश आहे. यामुळे देशातील न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्चपदी महिला असण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
आजवर प्रत्येक क्षेत्रात आपले अस्तित्व दाखवून देणाऱ्या महिलांचे प्रतिनिधित्व सर्वोच्च न्यायालयात पुरुषांच्या मानाने कमी होते. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही आजवर एकही महिला सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी विराजमान झाल्या नव्हत्या. पण या नियुक्त्यांमुळे न्यायमूर्ती बी. वी. नागरत्ना यांच्या रूपाने सप्टेंबर २०२७ मध्ये पहिल्या महिला सरन्यायाधीशाचा मार्ग मोकळा झाला आहे.


