कावेरीचा प्रश्न नक्की काय आणि किती जुना आहे बघा!

सध्या आपण हा कावेरी प्रश्न आहे तरी काय? ते बघुया. हा वाद गेले कित्येक वर्षे - तब्बल १२४ वर्षे - चालू आहे.  त्या वादाचा १२४ वर्षांचा इतिहास आपण पाहूयात:

कावेरीचा प्रश्न नक्की काय आणि किती जुना आहे बघा!

पुढिल जागतिक महायुद्ध पाण्यावरून होईल असे भाकीत अनेकांनी केल्याचे तुम्ही ऐकले असेल. सध्या चाललेल्या कावेरी पाणीवाटप प्रश्नामुळे जी काही दंगल-हिंसा चालू आहे त्यावरून जग याच भाकिताच्या दिशेने जातेय की काय? अशी शंका तुमच्या मनात नक्कीच आली असेल. भविष्यात असे जागतिक युद्ध वगैरे होईल का माहिती नाही; पण सध्या आपण हा कावेरी प्रश्न आहे तरी काय? ते बघुया.

कावेरी नदीचं पाणी आणि त्याचं वाटप हा तामिळनाडू व कर्नाटक या दोन प्रमुख राज्यांमधला अत्यंत गंभीर आणि महत्त्वाचा तंटा आहे. १८९२ आणि १९२४ या दोन वर्षी झालेले स्वातंत्र्यपूर्व काळातील करार या तंट्याच्या मुळाशी आहेत. हे करार तेव्हाचा मद्रास प्रांत आणि म्हैसूर संस्थानांमध्ये झाले होते. कावेरी नदी हा प्रचंड पाण्याचा साठा आहे. ८०२ किलोमिटर लांबीची ही नदी कर्नाटकातील कूर्गमधील तळकावेरी इथे उगम पावते आणि तामिळनाडूतील पुम्पहार इथे बंगालच्या उपसागराला मिळते. यात एकूण ७६ हजार वर्ग किमी इतके क्षेत्रफळ या नदीचे आहे, त्यातील ४४ हजार वर्ग किमी तामिळनाडूत तर ३२ हजार वर्ग किमी कर्नाटकात आहे.

कर्नाटकाची भुमिका: कर्नाटक म्हणतं की त्याला त्याच्या हिश्श्याचं पाणी मिळत नाही. त्यांच्या मते मद्रास प्रांत आणि म्हैसूर संस्थानांमधील आकडे चुकीचे तर आहेतच शिवाय ते नव्या राज्यव्यवस्थेनंतर नीट लागूही नाहीत. 

तामिळनाडूची भुमिका: तर तामिळनाडू म्हणते की जुन्या करारानुसार त्यांनी ऑलमोस्ट १२ हजार वर्ग किमी जमिन ओलिताखाली आणली आहे. आता अचानक कमी पाणी मिळाले तर तेथील शेतकर्‍यांनी करायचं काय? त्यामुळे हा वाद गेले कित्येक वर्षे - तब्बल १२४ वर्षे - चालू आहे. 

त्या वादाचा १२४ वर्षांचा इतिहास आपण पाहूयात: