देशोदेशी वेगवेगळ्या दिवशी इंजिनिअर्स डे साजरा केला जातो. भारतात तो १५ सप्टेंबरला साजरा होतो. सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा हा वाढदिवस. त्यांच्या बहुमोल कार्याबद्दल आदरांजली म्हणून भारत सरकारने त्यांचा वाढदिवस इंजिनिअर्स डे म्हणून जाहिर केला आहे. १८६१- १९६२ असं ९९ वर्षांचं आयुष्य लाभलेले विश्वेश्वरय्या हे शिक्षणानं सिव्हिल इंजिनिअर होते. त्यांनी त्यांच्या इंजिनिअरिंगच्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या उपयोगाची कामे करण्यासाठी केला. काही नवीन शोधही लावले. एकेकाळी घेतलेल्या सर्व्हेनुसार ते कर्नाटकातले सर्वात जास्त प्रसिद्ध व्यक्ती होते.
त्यांच्या कामाचं आणि हुशारीचं महत्व इतकं होतं की ब्रिटिश साम्राज्यालाही त्यांची दखल घ्यावी लागली होती. तर आजच्या या खास दिवशी पाहूयात ’फादर ऑफ मॉडर्न म्हैसूर- सर विश्वेश्वरय्या’ यांच्या कार्याबद्दल काही माहिती-





