आज आपले दिवंगत पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती आहे.लाल बहादूर शास्त्री म्हटलं की आठवतो त्यांचा निगर्वी साधेपणा ! जाहिरात क्षेत्रातील एक मान्यवर राम सेहगल यांची पहिली नोकरी एअर इंडियात फ्लाइट पर्सर म्हणून केली होती. या काळात अनेक व्हिआयपी प्रवाशांसोबत त्यांचा संपर्क आला. या मोजक्या आठवणी त्यांनी त्यांच्या आत्मचरीत्रात लिहिल्या आहेत. त्यापैकी लाल बहादूर शास्त्री यांची एक आठवण आज वाचा !
त्या काळी पंडित नेहरू -लाल बहादूर शास्त्री -इंदिरा गांधी हे सर्व पंतप्रधान नेहेमी इतर प्रवाशांसारखेच विमान प्रवास करायचे. व्हिआयपीना वेगळे विमान देण्याची प्रथा तेव्हा नव्हती. आपल्या देशाची आर्थिक परिस्थिती बघता आपल्यापुरते विमान वापरणे म्हणजे देशाचा पैसा वाया घालवणे, अशी ठाम श्रध्दा असलेल्या नेत्यांचे ते दिवस होते.

