महाराष्ट्राचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात : वाचा सविस्तर वृत्त 

महाराष्ट्राचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात : वाचा सविस्तर वृत्त 

बुधवारी मध्यरात्री भारतीय सैन्याने पाकिस्तानी सिमेत घुसून सर्जिकल अॉपरेशनमध्ये 40 दहशतवादी ठार केले. आणि देशभर एकच जल्लोष झाला. उरी हल्ल्याला सैन्यानं दिलेल्या या चोख प्रत्युत्तराचं सर्वत्र कौतुक सुरू आहे. पण भारतीयांच्या याच उत्साहाला विरजण लावलंय ते एका दुःखद बातमीने... 

बातमी अशी आहे की भारताच्या एका जवानाला पाक सैन्याने अटक केलीय. चंदू बाबूलाल चव्हाण असं या जवानाचं नाव असून ते धुळे जिल्ह्यातील बोरविहार गावचे आहेत. चंदू यांना पाकिस्तानी सैन्याने ताब्यात घेतलंय या बातमीच्या धक्कयाने त्यांच्या आजीचं काल रात्री निधन झालं. लाईन अॉफ कंट्रोलवर नजरचुकीने पाकिस्तानी सीमेत गेलेल्या चंदू यांना पाकिस्तानी सेनेने अटक करून मिलिटरी हेडक्वार्टर्समध्ये ठेवल्याचं वृत्त आहे. दरम्यान त्यांना सोडविण्यासाठी भारताकडून शक्य ते सर्व प्रयत्न सुरू आहेतच...

भारतीय सैन्याने केलेल्या सर्जिकल स्ट्राईक मध्ये चंदू यांचा सहभाग नसला तरी पाककडून परत परत हेच  सांगितलं जात आहे. 37 राष्ट्रीय रायफल्सचा जवान असलेल्या चंदू चव्हाण यांचा भाऊसुद्धा सैन्यात आहे. लहानपणीच आईवडीलांचं छत्र हरवलेल्या या भावंडाना आजी-आजोबांनी वाढवलंय. या वीर भारतीय जवानाची सुखरूप सुटका होऊदे अशी प्रार्थना करूया.