पंतप्रधानांना भेटायचंय? मग द्या फक्त वीस प्रश्नांची उत्तरे..

पंतप्रधानांना भेटायचंय? मग द्या फक्त वीस प्रश्नांची उत्तरे..

फक्त वीस प्रश्नांची उत्तरे तुम्ही पाच मिनिटांत दिलीत तर थेट नरेंद्र मोदींना तुम्ही भेटू शकता. त्याच बरोबर विजयी झालेल्यास पंतप्रधानांची स्वाक्षरी असलेले प्रमाणपत्रही दिले जाईल. mygov.nic.in या सरकारी संकेतस्थळाने प्रशासनात सुधारणा करण्याच्या हेतूने हा उपक्रम राबवण्याचे हाती घेतले आहे.

विचारलेल्या कोणत्याही प्रश्नाचे चार पर्यायांपैकी एक पर्याय निवडून उत्तर द्यायचे आहे. यात विचारलेले प्रश्न सरकारी योजना आणि कार्याशी निगडीत असतील. उदा.‘बेटी बचाव बेटी पढो योजने अंतर्गत किती जिल्हे समाविष्ट करण्यात आले आहेत ’? किंवा ’मुद्रा योजनेचा लाभ किती कर्जदारांना झाला?". सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्या नंतर लगेचच तुम्ही मिळवलेले गुण तुम्हाला स्क्रीन वर दिसतील. यात अवघड प्रश्नांना बाजूला ठेवण्याचा पर्याय देखील आहे.

काय करावे लागेल?

1. mygov.nic.in या संकेतस्थळावर जा

2. Governance Quiz वर क्लिक करा

3. पुन्हा एकदा तुम्हाला स्क्रीनच्या खाली उजव्या बाजूस Governance Quiz लिहिलेलं आढळेल. त्यावर क्लिक करा

4. Start Quiz वर क्लिक करून प्रश्नांना सुरुवात करा.

तर मग तयारीला लागा. दिल्ली अब दूर नहीं.....

टॅग्स:

narendra modi

संबंधित लेख