विदेशी पाहुण्यांची सरबराई आणि पाहुणचार हा एक गहन विषय आहे. पावलोपावली राजकीय शिष्टाचार मोडणार नाही याची काळजी घ्यावी लागते. विदेशी राष्ट्रप्रमुख आपल्याकडे आल्यापासून रवाना होईपर्यंत विदेश मंत्रालयाचा मुख्य शिष्टाचार अधिकारी आणि उपमुख्य शिष्टाचार अधिकारी यांच्या डोक्यावर दिवसरात्र टांगती तलवार असते. यात जरा कुठे माशी शिंकली की संपलंच सगळं!
सध्या आज जपानचे राष्ट्रप्रमुख भारत भेटीला आले आहेत. या दौऱ्याच्या गमतीजमती एखाद-दोन दिवसात पेपरात येतीलच. तरी सध्या मोदी, आणि आबे दांपत्याचा पहले आप, पहले आप करण्याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर फिरतोय.. तोपर्यंत आपण आधी घडलेले किस्से बघू या!









