आता शोध मोदींच्या क्लासमेट्स चा.

 आता शोध मोदींच्या क्लासमेट्स चा.

गेल्या दोन दिवसात सोशल मीडियावर एक पोस्टर जोरदार फिरतंय. त्या पोस्टरमध्ये ज्या कोणी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत शाळा, कॉलेज किंवा कोणत्याही शिक्षणसंस्थेत शिकलेल्या व्यक्तीने पुढे येण्याचे आवाहन केलेलं आहे.

गेल्या आठवड्यात दिल्ली विद्यापीठाने मोदींच्या डिग्री संबंधात असलेल्या एका RTI अर्जाचे उत्तर देण्यास नकार दिला. रोल नंबर माहित नसल्यामुळे हि माहिती देणे शक्य नाही असे कारणही देण्यात आले. पण आता समोर आलेल्या या पोस्टरमुळे आर टी आय मागील व्यक्ती शांत बसणार नसल्याचे जाणवते.  बंगलोरमधल्या एका टेकीने तर याबाबतीत माहिती देणाऱ्यास 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केलं आहे.

या आधी गुजरात विद्यापीठाने मोदींच्या मास्टर्स डिग्री संदर्भात केलेल्या आर टी आय चे उत्तर देण्यास नकार दिला होता.