जगात काहीजण असेही आहेत जे अशा प्रकारे लोकांचं लक्ष विचलित करून, हातचलाखी वापरून त्यांची एखादी वस्तू ढापण्यात कुशल आहेत !.
लक्ष विचलित होणं ही माणसाची सहजप्रवृत्ती आहे. काम करत असताना फोन, फेसबुक, व्हॉट्सऍप चेक करणं, मीटिंगमध्ये असताना दुसरीकडे पर्सनल चॅट करणं, एखाद्याशी बोलत असताना मनात दुसरेच विचार असणं ही सगळी याचीच उदाहरणं. नेमका याचाच वापर करत अमेरिकेतला अपोलो रॉबिन्स नावाचा चोर लोकांची वस्तू लांबवतो. जग त्याला सभ्य चोर म्हणून ओळखतं. का? तर हातचलाखी करून लांबवलेली वस्तू तो लगेच त्या व्यक्तीला परत देतो.





