खार हा तसा महाघाबरट प्राणी. खारूताईला कितीही प्रेमाने गोंजारलं, तरी ती घाबरून पटकन पळ काढते. माणसांच्या सानिध्यात तर थांबतच नाही, क्वचित एखादा पोळीचा किंवा फळाचा तुकडा घेण्यापुरता जमिनीवर येते तितकंच.
आता या खारूताईला जर भुईमुगाच्या शेंगा मिळाल्या तरी ती भित्रेपणामुळे एके ठिकाणी थांबणार नाही. मग पळून जाताना ती जास्तीत जास्त किती शेंगा घेऊन जाऊ शकेल असा प्रश्न पडतो ना? या प्रश्नाचं उत्तर वरच्या व्हिडिओमध्ये दडलंय. मोजा पाहू एकदा..
