आजकाल लोकांना आयफोन घेऊन मिरवायची दांडगी हौस असते. आयफोन जवळ बाळगणे म्हणजे जणू त्यांचा तो स्टेटस सिम्बॉलच बनलाय. असो. जगातले तमाम आयफोन वेडे ज्याची मनापासून वाट बघत होते, तो आयफोन 7 आणि आयफोन 7 प्लस अॅपलने बुधवारी रात्री लॉन्च केलाय. पाहूया या नव्या आयफोनमध्ये नवं काय आहे ते..
कॅमेरा :
आयफोन 7 प्लसमध्ये आहे 7 मेगापिक्सल पुढचा आणि 12 मेगापिक्सल ड्युअल रिअर कॅमेरा जो अगदी DSLR कॅमेर्याच्या तोडीचे फोटो काढू शकतो. या कॅमेराचे सेन्सर्स आधीपेक्षा 60% नी फास्ट आहेत आणि याचा प्रोसेसर फक्त 25 मिलीसेकंदात 100 अब्ज अॉपरेशन्स करू शकतो. 4 LED आणि क्वाड फ्लॅशसोबत कंपनीने या कॅमेरामध्ये अनेक नवी वैशिष्ट्ये दिली आहेत.
डिस्प्ले :
आयफोन 7 चा स्क्रीन आहे 4.7 इंच आणि आयफोन 7 प्लस चा 5.5 इंच. यामध्ये रेटिना HD तंत्रज्ञान वापरलंय. आणि आयफोन 6S पेक्षा हा आयफोन 25 % जास्त ब्राईट आहे.
बॉडी :
आयफोन 7 सोबत पहिल्यांदाच जेट हाय ग्लास फिनीशिंग मिळत आहे. हा आयफोन जेट ग्लॉसी ब्लॅक, मॅट ब्लॅक, गोल्ड, सिल्व्हर आणि रोझ गोल्ड अशा पाच रंगात तुमच्यासाठी उपलब्ध असेल.
स्टोअरेज :
आयफोन 7 ची इंटर्नल स्टोअरेज क्षमता 32 GB, 128 GB आणि 256 GB अशी आहे.
आयफोन मध्ये A10 फ्युजन क्वाड कोअर चिप वापरली आहे. सोबतच आयफोन 7 हा डस्ट आणि वॉटर रेसिस्टंट आहे. आणि विशेष म्हणजे यावेळी या आयफोनला हेडसेट जॅक दिलेला नाहीय. भारतामध्ये आयफोन 7 लॉन्च होतोय 7 आक्टोबरला. आयफोन 7 ची किंमत आहे 60,000 रु. तर आयफोन 7 प्लसची किंमत 90,000 ते 1,00,000 रु पर्यंत आहे.
