अक्षय कुमारला हे फोटो काढायची दुर्बुद्दी का झाली असावी?

लिस्टिकल
अक्षय कुमारला हे फोटो काढायची दुर्बुद्दी का झाली असावी?

राजीव भाटिया ते अक्षयकुमार हा आपल्या लाडक्या अक्कीचा प्रवास सगळ्यांना माहित आहेच. खिलाडी ते रूस्तम या प्रवासात त्याची ऍक्टिंग, ऐट या सगळ्यात तर चांगला बदल झाला आहेच. पण करिअरमध्ये ज्या इतर अभिनेत्यांनी केल्या त्या चुका त्या चुका त्याच्याकडूनही झाल्या आणि त्याचे पुरावे आज इंटरनेटवर पसरले आहेत. 

 आज त्याच्या ४९व्या वाढदिवसानिमित्त अक्षयला टीम बोभाटाकडून शुभेच्छा. आणि थोडीशी गंमत म्हणून पाहूयात त्याला  ओळख पटवावीशी न वाटतील असे काही त्याच्या सिनेमांतले फोटोज!!

खिलाडी, मि. खिलाडी, खिलाडियोंके खिलाडी

खिलाडी, मि. खिलाडी, खिलाडियोंके खिलाडी

अक्षयने एकेकाळी या खिलाडींची इतकी लाईनच लावली होती की तो बॉलीवूडचा खिलाडी म्हणूनच ओळखला जातो. तेव्हाचा त्याचा लूक आत्ता पाहिला तर हसू येतं . पण तेव्हा हाच त्याचा लूक यंग आणि डॅशिंग म्हणून जाम प्रसिद्ध होता. ओहो, तेव्हाचा लूक म्हणजे वरच्या फोटोतला नाही बरं..

हेअरस्टाईल्स

हेअरस्टाईल्स

काही सिनेमातले त्याचे लूक अगदी भन्नाट आहेत. इंटरनॅशनल खिलाडी हा त्यातला कळस असू शकेल.

ऍक्शन रिप्ले

ऍक्शन रिप्ले

पूर्वी त्याच्याकडे चॉईस नव्हता असं जरी मानलं, तरी आता पण तो असले प्रकार करायचं धाडस करतो म्हणजे खरंच कमाल आहे.

नवरात्र स्पेशल!!

नवरात्र स्पेशल!!

हा शर्ट पाहून दांडियारास सोडून दुसरं काहीच तुम्हाला आठवणार नाही.

हे नक्की काय आहे?

हे नक्की काय आहे?

हे नक्की काय आहे? आमच्याकडे तरी याचं उत्तर नाही. पण हा फोटो पाहून ’मेरे रंगमे रंगनेवाली’ गाण्यात भाग्यश्री एका ड्रेसवर अशीच शाल पांघरून येते हे आठवलं. 

 

तर मंडळी, तुमच्याकडेही त्याचे काही असे गंमतीदार फोटोज असतील तर कमेंटसमध्ये जरूर शेअर करा.

टॅग्स:

bobhata marathi infotainmentinfotainment marathimarathiBobhatabobhata newsmarathi newsbobhata marathimarathi bobhatabobhata infotainmentbobhata entertainmentmarathi infotainmentinfotainmentbobata

संबंधित लेख