अपारंपारीक स्त्रोतातून उर्जा मिळवण्याची धडपड गेली कित्येक वर्षे आपण करतो आहोत. त्यापैकी एक म्हणजे सतत वाहणार्या वार्यातून विजेची निर्मिती!
अवाढव्य आकाराच्या अनेक पवनचक्क्या उभारून विजेची निर्मिती करणे हा त्यापैकी एक यशस्वी उद्योग आहे पण त्यासाठी लागणारं भांडवल आणि इतर व्यवस्था करणं हे एक मोठं आव्हान आहे. यावर उपाय म्हणून ’जेरोम मिशो लॅरीवीअर’ या फ्रेंच शास्त्रज्ञाने घराच्या अंगणात वापरता येईल असं वार्याचं झाड बनवलंय. या झाडावर छोट्या छोट्या अनेक पवनचक्क्या बसवल्या आहेत. वार्याच्या हलक्याशा झुळुकेवर पण या चक्क्या चालतात आणि वीज तयार करतात. या वार्यावरच्या वरातीतून ३.५ किलोवॅट म्हणजे रस्त्यावरचे पंधरा दिवे किंवा बॅटरीवर चालणारी गाडी १३६० किमी धावेल इतकी वीज सहज मिळते.
कल्पना करा आपल्याही अंगणात अशी दहा झाडे लावली तर ......... :-)
