टूथपिक्स वापरता ? ही आहे टूथपिक वापरायची योग्य पद्धत..

टूथपिक्स वापरता ? ही आहे टूथपिक वापरायची योग्य पद्धत..

         घरात, अॉफीसमध्ये, हॉटेल्समध्ये.. सगळीकडे आपण जेवताना दातात अडकलेले अन्नकण काढण्यासाठी अनेक टूथपिक्स वापरून फेकत असतो. पण या टूथपिक्स वापरायची योग्य पद्धत आपल्यापैकी किती जणांना माहित आहे ? नाही ना ? या मग पाहूया... 

                       साधारपणे आपण जेवताना किंवा जेवल्यानंतर ही टूथपिक घेतो, दातात घालून तिच्या टोकदार बाजूने दात स्वच्छ करतो आणि फेकून देतो. काहीजण या टूथपिकचा पाठीमागचा डेकोरेटीव्ह भाग कानात पण घालत असतात. पण असं करून तर तुम्ही ती टूथपिक विनाकारण वाया घालवताय. इथून पुढे जेवताना जेव्हा तुम्ही टूथपिक वापराल तेव्हा ती लगेच फेकू नका. या टूथपिकच्या पाठीमागे असलेल्या डेकोरेटीव्ह भाग मोडा आणि तो त्या टूथपिकच्या टोकदार भागाखाली ठेवा. जेणेकरून ती टूथपिक जमिनीला स्पर्श करणार नाही आणि अस्वच्छ होणार नाही. यामुळे जेवताना अनेकदा वापरावी लागली, तरी आपल्याला तीच एक टूथपिक शेवटपर्यंत वापरता येईल.

            आहे ना तुमच्या उपयोगाची माहिती ? या एका बाजूला टोक असणाऱ्या टूथपिक्सचा शोध जपानमध्ये लागला होता आणि पर्शिया सारख्या काही देशांत तर धातूपासून बनवलेल्या कलात्मक टूथपिक्स वापरल्या जातात. पण एका रिसर्चनुसार दात स्वच्छ करण्यासाठी आदिमानवसुद्धा दातात काड्या घालत होता!! आता बोला...