आता फोन हातातून पडण्याची चिंता सोडा; पाहा नवीन उपाय.

आता फोन हातातून पडण्याची चिंता सोडा; पाहा नवीन उपाय.

पूर्वी नोकिया फोनच्या काळात मोबाईल्स गळ्यात अडकवले जायचे. मग बेल्टचे होल्डर्स आणि काय काय गोष्टी आल्या पण त्यामुळे मोबाईल हरवणे, विसरणे आणि हातातून पाडणे या गोष्टी काही कुणाला चुकल्या नाहीत. आणि या मोबाईलने दिवसेंदिवस लोकांना आपला गुलाम तर केलंच आहे आणि वर ’खालमुंडी’ही बनवलंय. 

हे सर्व टाळण्यासाठी सोसपेन्सो नावाची कंपनी बनवतेय एक मोबाईल होल्डर जो गळ्यात घालता येईल, तो ही अशा प्रकारे की आपली कामे करतानासुद्धा मोबाईल वापरता येईल. या होल्डरमुळे मान सतत झुकली जाऊन मानेचे विकार होणार नाहीत, डोळे आणि मोबाईलमध्येही चांगलं अंतर राहील आणि आपला मोबाईल वापरण्याचा हेतूही साध्य होईल. प्रसंगी स्वत:चा व्हिडिओ करतानासुद्धा असा होल्डर वापरता येईल असे दिसते. फक्त हा होल्डर दिसायला जरा बोजड दिसतो हाच सध्या त्यातला प्रॉब्लेम दिसतोय

अजूनतरी भारतात असे मोबाईल होल्डर्स दिसत नसले तरी कुणी सांगावं, नजीकच्या काळात ते उपलब्ध होतीलही.