तुम्हाला अँड्रॉइडच्या नवीन वर्जनचे नाव माहित आहे का ?

तुम्हाला अँड्रॉइडच्या नवीन वर्जनचे नाव माहित आहे का ?

गुगलने अँड्रॉइडच्या पुढच्या वर्जनच्या नावाची घोषणा केली आहे. १ जुलैला ‘नोगट’ हे अधिकृत नाव पुढील वर्जनसाठी निवडले गेल्याची घोषणा झाली असून थोड्याच दिवसात हे नवीन वर्जन आपल्या सगळ्यांच्या मोबाईलमध्ये असेल. नोगट हे इटली, फ्रांस, स्पेन मधील मिष्ठान्न आहे तसेच ते जगभरात देखील प्रसिद्ध आहे. नवीन वर्जनला कोणते नाव दिले जाईल याबद्दल प्रचंड उत्सुकता होती. त्यात एक नाव समोर येत होते ते म्हणजे ‘न्यूटेल्ला’ तसेच अँड्रॉइड वर्जनला ‘नेयप्पम’ या केरळच्या मिष्ठांनाचे नाव दिले जाणार अशीही बातमी फिरत होती पण तसे झाले नाही.

गुगलच्या पुढच्या वर्जनची निवड पब्लिक पोलने होणार असल्याची घोषणा गुगलचे सी.इ.ओ. 'सुंदर पिचई' यांनी केली होती. त्याप्रमाणे अनेकजण आत्तापासूनच पुढच्या नावाच्या शोधात आहेत. यात ‘ओरिओ’ हे नाव पुढे येत आहे. गुगलच्या मागील सर्व वर्जनच्या नावांवर नजर फिरवली असता लक्षात येईल की सर्व नावे ही मिष्ठांनावरून आहेत. कपकेक पासून सुरु झालेली परंपरा डोनट, आईसक्रीम सँडवीच, जेलीबीन, किटकॅट अशी फिरत आता नोगट वर येवून ठेपली आहे. पुढच्या वर्जनचे नाव काय असेल हे कोणीच सांगू शकत नाही पण जाता जाता एवढाच सांगेन की Z अभी बाकी हे मेरे दोस्त.

टॅग्स:

android

संबंधित लेख