आज एका कॅलेंडरप्रमाणे नव्या वर्षाचा पहिला दिवस आहे.कुठल्या धर्माचं किंवा देशाचं असेल बरं हे दुसरं नूतन वर्ष ?आज कुठे काही समारंभ होताना दिसत नाही, कुठे रोषणाई नाही, कुणी ग्रीटिंग कार्ड पण पाठवली नाही किंवा पोस्ट केली नाही, नाविन्याचा काहीही मागमूस नाही, असं कसं?
हे जाणून घेण्यासाठी थोडं इतिहासात डोकवावं लागेल.
भारताने १९५७ सालामध्ये अमलात आणलेल्या कॅलेंडरच्या नवीन वर्षाचा आज पहिला दिवस आहे. २२ मार्च १९५७ हा त्या कालगणनेतील पहिला दिवस होता. नव्या कालगणनेप्रमाणे त्या दिवसाचं बारसं चैत्र १, शके १८७९ असं करण्यात आलं.





