ItsMeFuzz (इट इज मी फझ) नावाच्या एका टिकटॉकरचा व्हिडीओ जानेवारी महिन्यापासून अचानक चर्चेत आला आहे.७० लाखाहून अधिक वेळा बघितला गेलेला या व्हिडीओत दोन चित्रे दाखवली गेली आहेत. या व्हिडीओच्या निर्मात्याचा दावा असा आहे की चित्रं बघता क्षणी तुमच्या जे नजरेस येतं त्यावरून तुमच्या स्वभावाचा अंदाज बांधता येतो.आता हा त्याचा दावा किती प्रमाणात योग्य आहे यावर चर्चा रंगल्या आहेत.या चर्चेचा निकालकाय लागायचा तो लागेलच पण तोपर्यंत ही दोन्ही चित्रे बघा आणि सांगा पाहताक्षणी काय दिसते तुम्हाला !
ही दृष्टीभ्रमाची चित्रं बघता क्षणी जे नजरेस येतं, ते सांगतं तुमचा स्वभाव ! तपासून बघा कसा आहे तुमचा स्वभाव !


पहिल्या चित्रात काहीजणांना सॅक्सॉफोन वाजवणारा माणूस दिसतो तर काहींना एका मुलीचा चेहेरा दिसतो.जर तुम्हाला मुलीचा चेहेरा दिसला तर तुमच्या मेंदूचा उजवा भाग अधिक प्रभावी आहे. त्यामुळे तुमचा स्वभाव सर्जनशील आणि कलात्मक आहे.
जर तुम्हाला आधी सॅक्सॉफोन वाजवणारा माणूस दिसला तर तुमच्या मेंदूचा डावा भाग अधिक जोरात काम करतो आहे, परिणामी तुम्ही तर्कप्रवण आणि विश्लेषक वृत्तीचे आहात असा निष्कर्ष बांधता येतो.

आता वळूया दुसर्या चित्राकडे !
काय दिसलं आधी ? वृक्ष दिसला ? ओह ! जर आधी वृक्ष नजरेस आला असेल तर तुमचा मानसिक कल तपशीलाला महत्व देणारा आहे. पण
तो वृक्ष नजरेस न पडता एकमेकांकडे रोखून बघणारे दोन व्यक्तींचे चेहेरे दिसले तर तुम्ही शांत प्रवृत्तीचे आहात.इतकंच नाही तर गंभीर प्रसंगी तुम्ही गडबडून जात नाही असाही तर्क बांधता येतो !
हा एक प्रयोग असावा असे आम्हाला वाटते तेव्हा फारसे गंभीर न होता, तुम्हाला काय दिसलं ते आम्हाला कमेंटकरून नक्की सांगा !