भारत - श्रीलंका टी२० मालिकेत या फलंदाजांनी पाडला धावांचा पाऊस, पाहा यादी

भारत - श्रीलंका टी२० मालिकेत  या फलंदाजांनी पाडला धावांचा पाऊस, पाहा यादी

नुकताच भारत आणि  श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये ३ टी२० सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेत सुरुवातीपासूनच भारतीय खेळाडूंचा दबदबा पाहायला मिळाला. अंतिम टी२० सामना ६ गडी राखून जिंकून भारतीय संघाने ही मालिका ३-० ने आपल्या नावावर केली. दरम्यान या मालिकेत भारतीय फलंदाजांनी देखील चांगली फलंदाजी केल्याचे पाहायला मिळाले होते. चला तर पाहूया या मालिकेतील सर्वाधिक धावा करणारे टॉप ३ फलंदाज.

) श्रेयस अय्यर :

भारतीय संघाला मालिका जिंकून देण्यात श्रेयस अय्यरने मोलाची भूमिका बजावली आहे. त्याने या मालिकेत अप्रतिम कामगिरी करत दाखवून दिले की, त्याच्यावर आयपीएल लिलावात मोठी बोली का लावण्यात आली आहे. त्याने ३ सामन्यात ३ अर्धशतकांच्या साहाय्याने २०४ धावा केल्या आहेत. याच कामगिरीच्या जोरावर त्याची मालिकावीर म्हणून निवड करण्यात आली होती.

२) दसून शनाका : 

श्रीलंका संघातील विस्फोटक फलंदाज दसून शनाका हा श्रीलंका संघाकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. तसेच या मालिकेत सर्वाधिक धावा करणारा तो दुसरा फलंदाज ठरला. त्याने या मालिकेतील ३ सामन्यात १२४ च्या सरासरीने १२४ धावा केल्या. यादरम्यान त्याने १ अर्धशतक झळकावले.

३) ईशान किशन :

आगामी आयपीएल हंगामासाठी ईशान किशनवर मुंबई इंडियन्सने सर्वात मोठी बोली लावली आहे. यासह तो आयपीएल २०२२ लिलावातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. त्याच्यावर इतकी मोठी बोली का लागली हे त्याने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. त्याने श्रीलंकेविरुद्ध झालेल्या मालिकेत २ सामन्यात ५२ च्या सरासरीने १०५ धावा केल्या. यादरम्यान ८९ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे.