देशात गुणी मुलांची कमी नाहीये हे अनेक उदाहरणातून सिद्ध झाले आहे. काही ना काही करत राहणे हा स्वभाव असला की अनेक मोठ्या गोष्टी निर्माण होऊ शकतात. लॉकडाऊनमध्ये अनेक मुले रिकामा वेळ व्हिडीओ गेम्स आणि इतर गोष्टीत खर्च करत असले तरी काही मुले या वेळेत भन्नाट गोष्टी देखील करत आहेत.
पुण्याच्या १६ वर्षीय प्रथमेश जाजू या मुलाने मात्र थेट देशाला भुरळ घातली आहे. त्याने काय केले तर एक ध्यास घेतला आणि त्यासाठी स्वतःला झोकून दिले. त्यातून जे बाहेर आले ते निव्वळ अफलातून आहे. प्रथमेशने आजवरचा सर्वात सुस्पष्ट असा चंद्राचा मिळवला आहे. या कामासाठी त्याचं सगळीकडून कौतुक होत आहे. त्याने नेमकं काय केलंय, आजच्या लेखातून पाहूया.


