आज १४ नोव्हेंबरला संध्याकाळी दिसणार सुपरमून..

आज १४ नोव्हेंबरला संध्याकाळी दिसणार सुपरमून..

आज १४ नोव्हेंबरला १९४८ नंतर पहिल्यांदाच दिसणार सर्वात मोठा चंद्र-सुपरमून.. सोप्या शब्दांत सांगायचं तर सुपरमून म्हणजे पौर्णिमेला जेव्हा चंद्र आकाराने सर्वात मोठा असतो आणि त्याचवेळेस तो पृथ्वीच्या भोवती फिरता-फिरता तिच्या सर्वात जवळ येतो, तेव्हा तो नेहमीच्या आकारापेक्षा खूपच मोठा दिसतो. चंद्र पृथ्वीभोवती पूर्ण वर्तुळाकार कक्षेत फिरत नाही, तो फिरतो अंडाकृती कक्षेत. त्यामुळं अशी पर्वणी नेहमीच येत नाही. 

तर आजचा सुपरमून एक्स्ट्रॉ सुपर असणार आहे. त्याचं कारणही खास आहे- आज ६९ वर्षांनंतर चंद्र पृथ्वी सर्वाधिक जवळ येणार आहे आणि यानंतर तो पृथ्वीच्या इतक्या जवळ येण्याची शक्यता  १८ वर्षांनंतर येईल. त्यामुळं आज तो नेहमीपेक्षा ३०% अधिक प्रखर दिसेल. नासाच्या शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार १४ नोव्हेंबरला ६:२१ EST म्हणजेच भारतात संध्याकाळी ४:५१च्या दरम्यान सुपरमून दिसायला सुरूवात होईल आणि त्यानंतर तो दोन-अडीच तासांत आणखी मोठा दिसेल.  आज पौर्णिमा असल्यानं सूर्यास्ताच्या आसपास लगेच चंद्रोदय होईल म्हणजेच चंद्राची फार वेळ वाट पाहावी लागणार नाही. 

या सुपरमूनच्या वेळेस चंद्र पृथ्वीपासून सुमारे ३,५०,०००किमी दूर असेल. आज संध्याकाळी आकाशात ढग नसतील सुपरमून सहजपणे पाहता येईल. त्यामुळे घराच्या गच्चीवर, मोकळ्या मैदानात किंवा जिथं हवेचं प्रदूष्ण कमी आहे तिथं सुपरमून नक्कीच चांगला दिसेल. चला तर मग, पाहूयात आज सुपरमून!!