ज्वालामुखी हा सर्वांसाठी मोठा कुतूहलाचा विषय आहे. ज्वालामुखीचा स्फोट, त्याचे तयार होणे, ज्वालामुखी पासून निघणारा लाव्हारस या सर्व गोष्टी माणसाला चकित करत असतात. आज आम्ही याच साखळीतील थोडी वेगळी गोष्ट सांगणार आहोत. हाच ज्वालामुखी आकाशातून कसा दिसत असेल?
आयएसएसमधल्या काही अंतराळवीरांनी जपानच्या कुरील आयलँड येथे असलेल्या सारीचेव ज्वालामुखीचे आकाशातून फोटो काढले आहेत. या फोटोंची मालिका जवळपास ११ वर्षं आधी २००९ साली काढली गेली होती. हा ज्वालामुखी शिखर कुरील आयलँड साखळीतील सर्वात जास्त जागृत समजला जातो.

