चिन तेंडुलकर जरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला असला तरी तो आजही क्रिकेट जगत असतो. वेळोवेळी भारतीय संघाला आणि त्याचा आयपीएल संघ -मुंबई इंडियन्स-यांना मार्गदर्शन करत असतो.वेळोवेळी त्याच्या स्वतःच्या बॅटिंगचे व्हिडिओ पण तो पोस्ट करतो.
नुकताच सचिनने आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर बंगालमधील एका लहान मुलाचा व्हिडिओ शेयर केला आहे.या मुलाची बॉलिंग क्रिकेटमधील सर्वश्रेष्ठ खेळाडू सचिनला पण आवडली आहे.या लहान मुलाची वय अवघं ८-१० असेल पण त्याची बॉलिंग बघितल्यावर या पठ्ठ्या पूढे जाऊन नाव करेल असेच कुणालाही वाटेल.
