तुम्ही ऑफिस कामासाठी कुठल्या आकाराचा कागद वापरता? A4 size, बरोबर ना? मुख्यतः कुठल्याही व्यवहारिक बाबींसाठी A4 आकाराचा कागद सगळीकडे वापरला जातो. अगदी भारतातच नाही तर जगभरात A4 अधिकृत छपाईसाठी मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. पण हा आकार आला कुठून? A4 व्यतिरिक्त इतर अनेक आकाराचे कागद वापरले जातात हे अनेकांना माहीत नाही. आज आपण याविषयी सविस्तर माहिती करून घेऊयात.
तुम्हाला माहिती आहे का, संपूर्ण जग दररोजच्या छपाईमध्ये A4 पेपरचा सर्वाधिक वापर करते. A4 पेपर शीट हा A आकाराच्या कागदाच्या मालिकेचा एक भाग आहे. या मालिकेत प्रत्येक कागदाचा आकार आणि परिमाण यामध्ये एक गणित असते.. या मालिकेतील प्रत्येक पेपरचा आकार आणि त्यामागे तर्क आहे.



