या ५ फलंदाजांनी कसोटी क्रिकेटच्या पदार्पणात झळकावले आहे दुहेरी शतक! यादीत एकही भारतीय नाही..

या ५ फलंदाजांनी कसोटी क्रिकेटच्या पदार्पणात झळकावले आहे दुहेरी शतक! यादीत एकही भारतीय नाही..

कसोटी क्रिकेटला १५० वर्षांपेक्षाही अधिकचा इतिहास आहे. क्रिकेटचा सर्वात जुना फॉरमॅट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कसोटी क्रिकेटमध्ये अनेक दिग्गज खेळाडू होऊन गेले. मात्र टी -२० आणि टी -१० क्रिकेटची क्रेझ वाढल्यापासून कसोटी क्रिकेटचा क्रेझ कमी होऊ लागला आहे. मात्र काही असे देखील खेळाडू आहेत, ज्यांनी केवळ आपल्या देशासाठी कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी हातात बॅट पकडली. बोभाटाच्या या लेखात आम्ही तुम्हाला अशा ५ फलंदाजांबद्दल माहिती देणार आहोत, ज्यांनी कसोटी क्रिकेटच्या पदार्पणाच्या सामन्यात दुहेरी शतकी खेळी केली.

) टीप फॉस्टर(Tip Foster) (इंग्लंड) :

इंग्लंड संघाचा माजी फलंदाज टीप फॉस्टर हा आपल्या पहिल्याच सामन्यात सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आला होता. त्याने ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध खेळलेल्या आपल्या पहिल्याच सामन्यात २८७ धावांची तुफानी खेळी केली होती. या खेळी दरम्यान त्याने ३७ चौकार मारले होते. या अप्रतिम खेळीच्या जोरावर इंग्लंड संघाने हा सामना ५ गडी राखून आपल्या नावावर केला होता. 

) लॉरेन्स रो (Lawrence Rowe) (वेस्ट इंडिज) :

वेस्ट इंडिज संघातील दिग्गज फलंदाज लॉरेन्स रावने १९७२ मध्ये न्यूझीलंड विरुध्द झालेल्या आपल्या पहिल्याच कसोटी सामन्यात २१४ धावांची खेळी केली होती. त्याने या खेळी दरम्यान एकूण १९ चौकार आणि १ गगनचुंबी षटकार मारला होता. मात्र हा सामना ड्रॉ झाला होता.

)ब्रेंडन कुरूप (Brendon Kuruppu) (श्रीलंका) :

श्रीलंका संघातील दिग्गज फलंदाज ब्रेंडन कुरूपच्या नावे देखील कसोटी क्रिकेटमधील पदार्पणाच्या सामन्यात दुहेरी शतकी खेळी करण्याचा विक्रम आहे. त्याने १९८७ मध्ये न्यूझीलंड विरुध्द झालेल्या पदार्पणाच्या सामन्यात २०१ धावा केल्या होत्या. या खेळी दरम्यान त्याने एकूण २४ चौकार मारले होते. त्याला आपल्या कसोटी कारकिर्दीत मात्र ४ कसोटी सामने खेळता आले. यादरम्यान त्याने ३२० धावा केल्या होत्या.

४) मॅथ्यू सिंक्लेअर (Matthew Sinclair) (न्यूझीलंड) : 

न्यूझीलंड संघातील फलंदाज मॅथ्यू सिंक्लेअरला १९९९ मध्ये वेस्ट इंडिज संघाविरुद्ध पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. या सामन्यात फलंदाजी करताना त्याने २१४ धावांची तुफानी खेळी केली होती. त्याच्या कसोटी कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर त्याने, ३३ कसोटी सामन्यांमध्ये एकूण १६३५ धावा केल्या होत्या.

) जॅक रुडॉल्फ (Jacques Rudolf) (दक्षिण आफ्रिका) : 

दक्षिण आफ्रिका संघातील फलंदाज जॅक रुडॉल्फ याला देशांतर्गत क्रिकेटमध्ये जोरदार कामगिरी केल्यानंतर,दक्षिण आफ्रिका संघात स्थान मिळाले होते. त्याने आपल्या कारकिर्दीतील पहिला सामना २००३ मध्ये बांगलादेश संघाविरुद्ध खेळला होता. या सामन्यात त्याने २२२ धावांची अप्रतिम खेळी केली होती. या खेळी दरम्यान त्याने एकूण २९ चौकार आणि २ गागांचुबकी षटकार मारले होते. मात्र त्याला दीर्घ काळ दक्षिण आफ्रिका संघासाठी क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली नाही.

एक प्रश्न तुमच्यासाठी, भारतीय संघासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात मोठी खेळी करणारा फलंदाज कोण आहे? उत्तर कमेंट करून नक्की कळवा.