भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ जेव्हा आमने सामने येत असतात तेव्हा चाहत्यांना रोमांचक लढत पाहायला मिळत असते. दुर्देवाने हे दोन्ही संघ केवळ आयसीसीच्या स्पर्धांमध्ये खेळताना दिसून येतात. गतवर्षी झालेल्या आयसीसी टी -२० विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान संघाने भारतीय संघाला पराभूत करण्याचा कारनामा केला होता. या ऐतिहासिक कामगिरीनंतर पाकिस्तान संघाचे अनेक दिग्गजांनी कौतुक केले होते.
पाकिस्तान संघाला विजय मिळवून देण्यात बाबर आजम,शाहीन आफ्रिदी आणि मोहम्मद रिजवान सारख्या खेळाडूंनी मोलाचे योगदान दिले होते. खेळाडूंचा उल्लेख झाला तर त्यांनी केलेल्या विक्रमांचा देखील उल्लेख होतो. तसेच त्यांनी केलेल्या विक्रमांसह अनेकांना खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यबद्दल देखील जाणून घ्यायचे असते. पाकिस्तान संघातील काही खेळाडूंच्या धर्मपत्नी इतक्या सुंदर आहेत की, त्यांच्या समोर बड्या बड्या अभिनेत्री देखील फेल आहेत. चला तर पाहूया.





